VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत भूमाता ब्रिगेड आक्रमक
Max Woman | 16 Sept 2019 7:37 PM IST
X
X
आज मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा इस्लामपूर येथे आली. त्यांनतर सभेच्या ठिकाणी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी “महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे" अशा घोषणा देत कार्यक्रमांमध्ये गोंधळ घातला.
अनेक महिला दारूबंदीसाठी मोर्चे काढत आहेत. अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. गुन्हेगारीत वाढ होत आहे, कित्येकांचे प्राण जात आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार दारूबंदीसाठी कोणतंही पाऊल उचलत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन सरकारने ‘दारूमुक्त महाराष्ट्र’ अशी अंमलबजावणी करावी. अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना दारुच्या बाटल्यांचे हार घालुन त्यांचे स्वागत करू. असं तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेपुर्वी म्हटले होते.
त्यांच्या या विधानामुळे तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी ताब्यात घेतले होते.
त्यानंतर आज जेव्हा मुख्यमंत्री इस्लामपूर येथे आपल्या महाजनादेश यात्रेची सभा घेत होते. यादरम्यान भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या- कल्पना चव्हाण, सविता राऊत, कस्तुरी पेटकर, लता खटावकर यांनी “मुख्यमंत्री दारूबंदी झालीच पाहिजे”, “तृप्ती देसाई यांना अटक का केली” ? अशा घोषणा करत या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला. यामध्ये संग्राम चव्हाण, शंकर पेटकर व रणजीत पाटील यांचा देखील समावेश होता.
Updated : 16 Sept 2019 7:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire