Home > रिपोर्ट > प्राणीमित्र दाम्पत्याने उभारली कोरोनामुक्त आरोग्याची गूढी

प्राणीमित्र दाम्पत्याने उभारली कोरोनामुक्त आरोग्याची गूढी

प्राणीमित्र दाम्पत्याने उभारली कोरोनामुक्त आरोग्याची गूढी
X

कोरोना च्या प्रभावाबद्दल चर्चा करत असतानाच गणराजची नजर मुंबई-ठाणे आणि आसपासच्या भागातील आकडेवारीवर नजर गेली. तो पत्नीला म्हणाला, अगं पण हे सगळं फारच गंभीर होताना दिसतंय...आणि क्षणभरात त्याच्या तोंडातून निघून गेलं की, "बास आता, तूही सुट्टी घे १५ दिवस".

त्यावर ती थोडी अस्वस्थ होत म्हणाली, "युध्दाच्या वेळी सैनिकांनी सुट्टी घ्यायची नसते. आत्ता समाजाला जास्त गरज आहे डाॅक्टरांची अशावेळी..डाॅक्टरांनी असं वागून कसं चालेल..!! डाॅक्टरांनी जर स्वतःचा विचार करत सुट्टी घेतली तर रुग्णांचे हाल होतीलच, पण त्याहीपेक्षा या महत्वाच्या परिस्थितीत समाजात चुकीचा मेसेज जाऊन गैरसमज निर्माण होतील. मी तर सोड, कोणतेच सच्चे डाॅक्टर असं करणार नाहीत."

गणराज जैन बदलापुरातील अपंग प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या पाणवठा ह्या अनाथाश्रमाचा संचालक आणि त्याची डाॅक्टर बायको अर्चना यांच्यातला हा संवाद ! "पत्नी ,आई म्हणून तर तू भारी आहेसच पण एक डाॅक्टर म्हणून आम्हाला सर्वांना तुझा अभिमान आहे. तुझ्या सोबतच स्वतःच्या तत्वांना घट्ट धरुन ठेवलेल्या हजारो डाॅक्टरांना विनम्र सलाम..!" अशी कृतज्ञता गणराजने आपल्या पत्नीप्रती व्यक्त केलीय.

त्याचसोबत या पतीपत्नीने जी गुढी उभारलीय ती.. आरोग्याची.. कर्तव्याची आहे. नव्या वर्षाचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा" हे ब्रीदवाक्य म्हणत दोघेही गेली अनेक वर्षे पर्यावरणाची गुढी साजरी करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांनी आरोग्याची गुढी उभारली आहे.

आज संपूर्ण विश्वाला आरोग्य संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे "स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा" संदेश देण्याकरीता केलेला हा छोटासा प्रयत्न.. असं डाॅ. अर्चना जैन यांनी म्हटलंय.

"शासनाचे बाहेर न पडण्याचे आवाहन" पाळत घरीच असलेल्या साहित्यापासून ही गुढी उभारली आहे. ज्यात पडद्याचा राॅड, देवघरातील लाल कापड, दोरी, हळद-कुंकू या सोबतच "स्वतःची काळजी घ्या" हा संदेश देण्यासाठी सॅनिटायजर, मास्क, हॅन्ड वाॅश व फ्लोअर क्लिनर इ. चा वापर केला आहे.

कोरोनासारखे महाभयंकर संकट आपल्या देशातून व विश्वातून समूळ समाप्त होण्यासाठी आपण स्वतः काळजी घेउन स्वतःच्या कर्तव्याचा व आरोग्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरवातीला करुया, असा संदेश अर्चना आणि गणराज जैन या प्राणीमित्र दाम्पत्याने यंदाच्या मराठी नववर्ष निमित्ताने दिला आहे.

Updated : 26 March 2020 7:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top