इतिहासात पहिल्यांदा वाढदिवशी धावली नाही ‘डेक्कन क्विन’
X
1 जून 1930 पासून पुणेकरांच्या सेवेत असलेली डेक्कन क्वीन आज 9० वर्षांची झाली. ही गाडी आपल्या वाढदिवशी धावली नाही असं आज पहिल्यांदाच घडलं असेल. दरवर्षी ही दख्खनची राणी आजच्या दिवशी छान सजते. तिच्याशी सख्खं नातं जडलेले प्रवासी केक कापून तिचा वाढदिवस आनंदाने साजरा करतात. मगच ती निघते दिमाखात.. पण सध्या लॉकडाऊनमुळे लाडक्या डेक्कन क्विनचा वाढदिवस पुणेकरांना जल्लोषात साजरा करता आला नाही.
लॉकडाऊनमुळे डेक्कन क्विन मुंबईत अडकली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा होऊ शकला नाही. म्हणून प्रवाशी मंचाने डेक्कन क्विनची प्रतिकात्मक रेल्वे आणून 'त्या' बरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रवाशांनी आठवणींना उजाळा दिला.
हे ही वाचा...
- भागवत सांप्रदायातील लोक गळ्यात तुळशी माळ का घालतात?
- ‘शिवाजी महाराजांच्या नावावर अवैध धंदे’, तृप्ती देसाईंनी दाखवले पुरावे
- क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीचा न्युड फोटो पाहून नेटकरी अवाक्
डेक्कन क्विन पुणेकरांची लाडकी का?
तेव्हाच्या ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ने (जीआयपीआर) अर्थात आताच्या मध्य रेल्वेने ‘डेक्कन क्वीन’च्या रूपाने भारतातील पहिली डिलक्स रेल्वे सुरू केली. ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे.
विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी, महिलांसाठी विशेष डबा जोडण्यात आलेली तसेच गाडीत स्वतंत्र ‘खान-पान डबा’ (डायनिंग कार) असलेली पहिली गाडी असे अनेक बहुमान ‘डेक्कन क्वीन’ला मिळाले आहेत. ही गाडी पहिल्यांदा सात डब्यांची होती, नंतर ही संख्या १२ झाली आणि सध्या ही गाडी १७ डब्यांची आहे.
या आपल्या खास डेक्कन क्विनची काही फोटो पाहुयात..
[gallery columns="1" size="publisher-lg" bgs_gallery_type="slider" ids="14025,14022,14024,14021"]