Home > रिपोर्ट > उर्मिला विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार

उर्मिला विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार

उर्मिला विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार
X

निवडणुकीच्या रिंगणात उत्तर मुंबईतून उतरलेली काँग्रेसची उमेदवार उर्मिला मांतोडकर सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरु लागली आहेत. कारण जशी ती राजकारणात सक्रीय झाली आहेत तसं तिने प्रचारासाठी वेगवेगळ्या फंड्यांचा वापर करु लागली आहे. तिच्या अशा प्रचारामुळे यंदा निवडणुकांत तिचं बाजी मारतील असं चित्र दिसत आहे. बहुतेक हेच भाजपाला पटलेलं दिसत नाही म्हणून उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भाजपाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

उर्मिला मार्तोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वा इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला उर्मिला मार्तोंडकर हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दरम्यान तिने हिंदू धर्म हा जगातील सर्वात जास्त हिंसाचार घडवणार धर्म असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी केलेव्या वक्तव्यामुळे माझ्यासारख्या अनेक हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ही सर्व वक्तव्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केली आहेत. त्यामुळे उर्मिला मातोंडकर, राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, असे नाखवा यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/SureshNakhua/status/1114547267548123136?s=19

Updated : 7 April 2019 12:32 PM IST
Next Story
Share it
Top