Home > रिपोर्ट > कुर्ल्यात उद्रेक! मुलीला न्याय मिळाला नाही म्हणून बापानं केली आत्महत्या..

कुर्ल्यात उद्रेक! मुलीला न्याय मिळाला नाही म्हणून बापानं केली आत्महत्या..

कुर्ल्यात उद्रेक! मुलीला न्याय मिळाला नाही म्हणून बापानं केली आत्महत्या..
X

मुंबईतील कुर्ला परिसरातील पंचाराम रिठाडिया यांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी पोलीस खात्याकडून शोध घेण्यात सहकार्य मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. याचा विरोध दर्शवण्यासाठी नेहरू नगर परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

अपहरण केलेल्या संशयितांकडून तक्रार न करण्याची धमकी देण्यात आली असून कुटुंबातील इतर दोन मुलींनाही उचलण्याची धमकी दिली जात असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

संतप्त आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून या प्रकरणाची दाहकता एका बापाने प्राण गमावल्यानंतर वाढत आहे. संबंधित विषयाचं प्रक्षेपण करत असल्यामुळे मॅक्स महाराष्ट्राच्या पत्रकारांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. काल संध्याकाळीही १५ ते १६ वर्षांच्या मुलांनी कँडल मार्च काढला होता. मात्र, या मार्चलाही पोलिसांकडून पांगवण्यात आलं होतं.

या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र अपहृत मुलीचा शोध लागाणार का ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

Updated : 22 Oct 2019 4:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top