Home > रिपोर्ट > महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु करा : यशोमती ठाकूर

महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु करा : यशोमती ठाकूर

महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु करा : यशोमती ठाकूर
X

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी अशी मगणी यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांना बसने येण्याजाण्यास खुप अडचणी येत आहेत. एक दोन तास बसची वाट बघावी लागेत. बसमध्ये गर्दी देखील प्रचंड असते. बसमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसची संख्या वाढवावी आणि त्याच प्रमाणे महिलासांठी विशेष बस सेवा उपलब्ध करून द्यावी असं यशोमती ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे.

Updated : 16 Sept 2020 12:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top