जगातल्या सगळ्या “ग्रेटा”नी जगातल्या सगळ्या “डोनाल्ड ट्रम्प”ना भिडावे
X
दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेटा थुनबर्ग या क्लायमेट चेंज वर जीवाचे रान करणाऱ्या, अजून शाळा / कॉलेजच्या वयात असणाऱ्या तरुण कार्यकर्तीची खिल्ली उडवली. योगायोग नाहीये.
ग्रेटा स्त्री आहे आहे. डोनाल्ड ट्रम्प पुरुष. ग्रेटाचा जन्मच एकविसाव्या शतकात झालाय आणि डोनाल्ड ट्रम्प सारे विसावे शतक कोळून आज सत्तरीमध्ये आहेत. ग्रेटा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील एक श्रीमंत व्यक्ती. ग्रेटाची १०० टक्के निरागसता तर डोनाल्ड ट्रम्प जगातील एक खोटारडा माणूस. ग्रेटाचे तिच्या मांडणीत एका डॉलर्सचे भौतिक हितसंबंध नाहीत तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील व जगातील बलाढ्य कोर्पोरेटचे हितसंबंध सांभाळतात.
प्रिय ग्रेटा,
तुम्ही जगातील सगळ्या डोनाल्ड ट्रम्पना भिडा
सामाजिक, धार्मिक, स्त्रियांच्या, आर्थिक, पर्यावरणीय प्रश्नावर भिडा
पुरुष म्हणून येणाऱ्या, वयाने वडीलधारे म्हणून येणाऱ्या, कॉर्पोरटची साधनसामुग्री पाठीशी असल्यामुळे येणाऱ्या सत्तेचा माज अंगात भिनल्यामुळे येणाऱ्या, जगावर एकहाती राज्य करणाऱ्या देशातून आल्यामुळे येणाऱ्या
अंगात माज असणाऱ्यांना भिडा.
तू जे काय मांडत आहेस. यात तू मोठी होशील तशी अधिक परिपकवता नक्कीच येईल;
मांडणी महत्वाची असते; पण मांडणी म्हणजे सर्व काही नाही. कारण मांडणी सतत विकसित करता येते.
महत्वाचे आहे तुमचे / तुझे स्पिरिट, तुझा ऍक्टीव्हीजम, जगाच्या व स्वतःच्या भवितव्याबद्दल खरी चिंता
त्याच्या ज्योती जिवंत ठेवा.
हे सर्व करतांना सर्वात महत्वाचे तब्येतीची काळजी घ्या !
आम्ही तुझ्याबरोबर आहोत.
-संजीव चांदोरकर