रेल्वे ट्रॅकवर सोडलेल्या 'नकोशी'ला धनंजय मुंडेंनी घेतलं दत्तक
X
देशभरात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ नारा लावला जातो. सरकार स्त्रीभृणहत्या थांबवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्षात पोटी जन्मलेली लेक 'नकोशी' झाली म्हणून काही समाजकंटक त्या मुलीला कचऱ्याच्या पेटीत किंवा निर्जण स्थळी टाकून पळ काढतात. असाच एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडलाय. नवजात अर्भकाला रेल्वे-ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात टाकून कोणीतरी पळ काढला.
पोटी जन्मलेल्या लेकीला 'नकोशी' म्हणत रेल्वे पटरी जवळ काटेरी झुडुपात टाकून कोणीतरी पळ काढला. पालकमंत्री @dhananjay_munde साहेबांना या गोष्टीची माहिती मिळताच लेकींचा बाप असलेल्या तुम्हाला मला वाटावी त्या संवेदनशीलतेने तात्काळ त्या लेकीचे पालकत्व स्वीकारून, तिचा उपचार, तिचे शिक्षण , pic.twitter.com/ei293W3UiY
— बीड जिल्हा राष्ट्रवादी (@NCPSpeakBeed) February 24, 2020
या घटनेची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मिळताच तात्काळ तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केलं.धनंजय मुंडे (Dhananjay Munde) इतक्यावरच न थांबले नाहीत तर त्यांनी मुलीचं पालकत्वही स्वीकारलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुलीचं नाव शिवकन्या असं ठेवलं आहे. शिवकन्याच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि धनंजय मुंडे यांनी स्विकारली आहे.