Home > रिपोर्ट > शेतकरी आंदोलन 'ग्लोबल' करणाऱ्या महिला..

शेतकरी आंदोलन 'ग्लोबल' करणाऱ्या महिला..

जागतिक स्तरावरील सेलीब्रिटी महिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतायत आणि आपल्याच देशातील सेलिब्रीटी या शेतकऱ्यांना दहशदवादी ठरवत आहेत.

शेतकरी आंदोलन ग्लोबल करणाऱ्या महिला..
X

३ नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन दडपण्यासाठी आता केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमांवर भिंती बांधल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाणी, टॉयलेटची सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. तर या भागात इंटरनेटही सरकान बंद केले आहे. एकीकडे सरकारने ही मुस्कटदाबी केली असताना आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळू लागला आहे. यामध्ये प्रसिद्ध पॉप गायिका रिहाना हिने शेतकऱी आंदोलनाचा एक फोटो ट्विट करत आपण याबद्दल का बोलत नाही, असा सवाल विचारला आहे. तर दुसरीकडे जगप्रसिद्ध तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थमबर्ग हिनेही आपण शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत असे जाहीर केले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

ग्रेटा थनबर्ग ही एक तरुण पर्यावरणवादी स्वीडीश कार्यकर्ती आहे. ३ जानेवारी २००३ रोजी जन्मलेली ग्रेटा 15 वर्षांची असताना तिने हवामान बदलाच्या मागणीसाठी स्वीडनच्या संसदेबाहेर संप केला होता. त्यानंतर ग्रेटा जागतिक पातळीवर चर्चेत आली. हवामान बदलासंदर्भात जगभरातील सर्व देशांनी पुढाकार घ्यावा यासाठी ग्रेटा प्रयत्न करत आहे आणि विविध नेत्यांना तिने आतापर्यंत आवाहनही केले आहे.


कोण आहे रिहाना?

रिहाना ही एक कॅरेबियन प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. रॉबिन रिहाना फेंटी असे तिचे पूर्ण नाव आबहे. २० जानेवारी १९८८ मध्ये बार्बाडोसमध्ये रिहाना हिचा जन्म झाला आहे. ट्विटरवर रिहानाचे सध्या १० कोटी फॉलोअर्स आहेत.


कमला हॅरीस यांच्या भाचीचा शेतकऱ्यांना पाठिंबा

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भाची आणि लेखिका मीना हॅरीस यांनीही या आंदोलनाला पाटिंबा देणारे ट्विट केले आहे. "जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही महिनाभरापूर्वी हल्ला झाला होता. आणि आता सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या लोकशाहीवर हल्ला झाला आहे. यात काहीतरी परस्पर संबंध आहे. भारतात शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेल्या निलष्करी दलाच्या कारवाईचा आणि इंटरनेट बंद करण्याच्या कारवाईचा आपण निषेध केला पाहिजे," असे ट्विट मीना हॅरीस यांनी केले आहे.


हॉलिवूड अभिनेत्री अमंडा सेर्नीचा पाठिंबा

आता हॉलिवूडमधूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अंमडा सेर्नी हिने इन्स्टाग्रामवर आंदोलक शेतकरी महिलांचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, "जग पाहत आहे. मुद्दा समजून घेण्यासाठी तुम्ही भारतीय किंवा पंजाबी किंवा आशियाई असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त मानवतेची जाणीव असली पाहिजे."



Updated : 3 Feb 2021 4:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top