दोन महिन्यांच्या लॉकडाऊन मधून 'हे' यश लागलं हाती
X
देशात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९२हजार ५३५ झाली असून मृत्यूंची संख्या ५६०० च्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ८३९२ नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर २३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यात देशात कोरोनाबाधीत पहिला रुग्ण सापडल्यानंतर मे च्या अखेरीस ही संख्या १ लाख ९० हजारांच्या वर गेली आहे. पण यातील दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी ४८.१९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १५ एप्रिल रोजी हे प्रमाण ११.४५ टक्के होते.
दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. एप्रिल मध्ये ३.३० टक्के असलेला मृत्यूदर हा आता २.८३ टक्क्यांवर आला आहे. एकूण ६७६ लॅबमधून आतापर्यंत ३८ लाख ३७ हजार २०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर सोमवारी १ लाख ८० रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगातील टॉप १० देशांमध्ये ७ व्या क्रमांकावर असला तरी मृत्यूदर जास्त असलेल्या टॉप १० देशांच्या यादीत भारत नाहीये.