Coronavirus : प्रायव्हेट हॉस्पिटल्स चे दरवाजे बंद होणार?
X
(Coronavirus) कोरोनाच्या साथीमुळे छोटे प्रायव्हेट हॉस्पिटल्स अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहेत.
त्यांच्याकडे असणारे रिसेप्शननिस्ट, नर्सेस, वॉर्डबॉयज, स्वच्छता कर्मचारी ड्युटीवर येण्यास सरळ सरळ नकार देत आहेत.आमचे घरचे हॉस्पिटलमध्ये पाठवत नाहीत,आम्हाला कामावरून काढून टाकलं तरी चालेल असे म्हणत आहेत.
(Coronavirus) कोरोनाच्या साथीमुळे PPE kit,N95 तर सोडाच पण साधे सर्जिकल मास्क सुद्धा मिळणं अवघड होत आहे.
अश्या वेळी हॉस्पिटल्स सुरू ठेवण्याची सक्ती शासन आणि प्रशासन का करत आहे?केवळ कारवाईच्या भीतीने एकही स्टाफ येत नसताना आम्ही काम कसे करायचे?आणि दुर्दैवाने आमच्या कर्मचाऱ्यांना (Coronavirus) कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी कोणाची?
कित्येक पेशन्ट,नातेवाईक ट्रॅव्हल हिस्ट्री आणि (Coronavirus) कोरोना पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट हिस्ट्री लपवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.असे लोक कोणतीही लक्षणे नसतानाही डॉक्टरांना,हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना इन्फेक्शन देऊन जाऊ शकतात.
सरकार डॉक्टर,कर्मचारी यांना N95 रेस्पिरेटर देणार आहे काय?
स्वच्छता कर्मचारी येत नसेल,कचरा उचलला जात नसेल तर तपासणी ,ऑपरेशन्स, प्रसूती कशी करायची?हे सरकारने,प्रशासनाने सांगावे.
हे ही वाचा
फिलीपीन्स राष्ट्रपतींच्या ‘त्या’ जीवघेण्या निर्णयाची झाली अंमलबजावणी
की आता लॉकडाऊनमुळे घरातील स्वैपाक धुणी भांडी केर यासोबत आम्ही डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्येही साफ सफाई,कपडे धुणे स्वतःच करायचे आहे ?
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याची सक्ती करू नये,ज्यांना शक्य आहे ते हॉस्पिटल सुरू ठेवतीलच.पण सक्ती नको.
डॉ साधना पवार,पलूस.