कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश.. भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
X
देशातील कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केले. नागरिकांनी लॉकडाउनचं सक्तीने पालन कराव अशी विनंती त्यांनी यावेळी केली. कोरोनापासून बचावासाठी घरात च बसून राहा असा सल्ला त्यांनी देशाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...
-लॉकडाऊन ला आज ९ दिवस पूर्ण झाले. या काळात सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद. आज जगभरातील अनेक देश याचं अनुकरण करतायत.
-देशाने देशभावना दाखवली. आपण एक होऊन कोरोना शी लढू शकतो हे आपण दाखवून दिलं.
-आपण विचार करत असाल की इतकी मोठी लढाई एकट्याने कसं लढणार. पण मित्रांनो आपण जरूर आपापल्या घरात आहात, मात्र १३० कोटी लोकसंख्येची सामुहीक शक्ती एकत्र आहे.
-जनता जनार्दन इश्वराचं रूप असते असं आपल्या इथे मानलं जातं. आपण या विराट शक्तीचं वारंवार दर्शन केलं पाहिजे. इथूनच आपल्याला उर्जा मिळते.
-आपल्या गरीब भाऊ-बहिणींना कोरोना मुळे झालेल्या त्रासातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. या सगळ्या लोकांना अंध:कारातून बाहेर काढायचं आहे.
-या पाच एप्रिल ला १३० कोटी लोकांच्या महाशक्ती आणि महासंकल्पाचं दर्शन घडवायचं आहे.
-पाच एप्रिल ला रात्री ९ वाजता घराचे सर्व दिवे बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल ची फ्लॅशलाइट किंवा दिवे लावा
-घरातले सर्व दिवे प्रकाशीत करून जर हा प्रकाशपर्व आपण साजरा करू शकलो तर आपण असा संकल्प दाखवू शकतो की आपण एकटे नाहीयत.
-या वेळी बाहेर पडू नका, सोशल डीस्टंसिंग पाळा, कोरोनाची चैन तोडायचा हाच रामबाण उपाय आहे. ५ तारखेला ९ वाजता थोडा वेळ बसून भारतमातेचं स्मरण करा.