जगातील २९० लाख मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर.....
X
कोरोना विषाणु ने आता भारतात प्रवेश केला आहे. आतापर्यंत २८ जणांना कोरोनाची लागण झालीय. दिल्लीत १२ च्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परिक्षेची ताऱीख पुढे ढकलण्यात आली होती. विषाणूचा प्रसार होताच इतर देशांनीही विलक्षण उपाययोजना राबविल्या असून युनेस्कोने बुधवारी असे म्हटले आहे की, १३ देशांमध्ये शाळा बंद केल्या आहेत. जगभरात २०० दशलक्ष पेक्षा जास्त मुलें कोरोनाबाधित झाली आहेत. तर इतर नऊ देशांनी स्थानिक बंदी लागू केली आहे.
युनेस्कोच्या महानिदेशक ऑड्रे एज़ोले काय म्हणाल्या?
संकटकाळात शाळा तात्पुरत्या बंद होणे नवीन नसलं तरी “सध्याचा शैक्षणिक व्याप बघितल्यास जागतिक पातळीवर हा विषाणू वेगाने पसरत आहे आणि दिर्घकाळ राहिल्यास शिक्षणाच्या अधिकाराला धोका निर्माण होऊ शकेल.
आतापर्यंत किती देशांनी शाळा केल्या बंद आणि जगाच्या पाठीवर कसे चित्र निर्माण झाले?
• सद्य स्थितीला भारतातचं फक्त दिल्लीतील नोएडा मध्ये काही शाळा बंद आहेत.
• इटलीने बुधवारी 15 मार्चपर्यंत शाळा व विद्यापीठे बंद ठेवण्याचे आदेश दिले.
• फ्रान्समध्ये या आठवड्यात जवळपास 120 शाळा बंद झाल्या आहेत.
• इराणमध्ये, जेथे या आजाराने 92 लोकांचा मृत्यू झाला आहे, तेथे शाळा बंद ठेवल्या गेल्या आहेत आणि प्रमुख सांस्कृतिक आणि क्रिडा कार्यक्रम निलंबित करण्यात आले आहेत.
• सौदी अरेबियाने वर्षभर चाललेल्या 'उमराह' तीर्थक्षेत्राला स्थगिती दिली असून वार्षिक हज यात्रेवर अनिश्चितता निर्माण झाली आहे.
जागतिक बॅंकेने पुढाकार घेत कोरोना विषाणू लढण्यासाठी 12 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजचे अनावरण केलेय. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “देशातील गरजांना प्रतिसाद देणारी जलद आणि प्रभावी कृती करणे हे आमचे ध्येय आहे."