Home > रिपोर्ट > लॉकडाऊन: ‘त्या’ दुरावलेल्या माय लेकराला सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकत्र आणलं

लॉकडाऊन: ‘त्या’ दुरावलेल्या माय लेकराला सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकत्र आणलं

लॉकडाऊन: ‘त्या’ दुरावलेल्या माय लेकराला सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकत्र आणलं
X

राज्यातील लॉकडाऊन काळात चालू असताना एक माणुसकीचं दर्शन घडवणारी आणि पोलिसांनी या कठीण काळातही ताटातुट झालेल्या एका माय-लेकराला एकत्र आणण्यासाठी केलेल्या मदतीची हृदयस्पर्शी घटना समोर आली. पुण्यातील मगरपट्टा परिसरात स्थायिक असलेलं पुनम व सचिन फुसे दाम्पत्य. त्यांचा ११ महिन्याच्या मुलगा २० मार्चपासून मावळ येथे पुनम यांच्या आई- वडिलांकडे होता.

दरम्याच्या काळात लॉकडाउन लागू झाला. तो १४ एप्रिलपर्यंत उठेल असा फुसे दांपत्याचा अंदाज होता. परंतु, तो ३ मे पर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झाले. आपल्या बाळाला भेटण्यासाठी पुनम यांची धडपड सुरू झाली. बाळदेखील आईच्या आठवणीने सारखे रडत होते. त्यामुळे आजी- आजोबांसह फुसे दांपत्य अस्वस्थ होते. सारखे रडत असल्यामुळे बाळाची तब्येतही खराब होत होती.

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पूनम यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याशी संवाद साधला आणि पुनम यांना डिजिटल पास मिळण्यासाठी प्रयत्न केला. शहराची हद्द ओलांडली जाणार होती. सध्या शहरांच्या सीमा सील केल्या असल्यामुळे डिजिटल पास मिळणे जिकिरीचे होते. परंतु सुप्रिया सुळे यांनी हा प्रकार गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजवून सांगितला. अखेर फुसे दांपत्याला 20 एप्रिल रोजी पोलिसांकडून डिजिटल पास मिळाला.

पास मिळाल्यानंतर आई वडिल 21 एप्रिल रोजी प्रवास करून आपल्या बाळापर्यंत पोहोचले. योगायोगाने त्या बाळाचा पहिला वाढदिवस 21 एप्रिल रोजीच होता. आई- बाळाने एकमेकांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला आणि दोघेही रडू लागले. त्यानंतर फुसे दांपत्य पुण्यात घरी सुखरूप पोहोचले.

https://youtu.be/20SvJ0IVyb0

या घटनेबाबत पूनम म्हणाल्या, "आम्हाला गरज होती, तेव्हा सुप्रियाताईं अक्षरशः देवासारख्या धावून आल्या. त्यांच्या मदतीमुळेच आमचे बाळ आमच्या ताब्यात आले. सुप्रियाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही."

सुप्रिया सुळे यांनी "एका बाळाची आईची भेट होणे गरजेचे होते. त्यामुळेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही पोलिस प्रशासनाला विनंती केली. कोरोनाची परिस्थिती सध्या वेगळी असली तरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे." अशी भावना व्यक्त केली.

Updated : 25 April 2020 10:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top