वडिलांनी ठेवलं आपल्या मुलाचं नाव काँग्रेस...
X
आपले पाळण्यात ठेवलेले नाव शेवटपर्यंत तेच राहते असं नाही आजपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी देखील आपले नामकरण केले आहे. तर काही लोकं मुलं होण्याच्या आधीच बाळाचे नाव ठरवत असतात. असाच प्रकार राजस्थानमध्ये उदयपूर ठिकाणी घडला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या विनोद जैन यांनी आपल्या मुलाचे नाव 'काँग्रेस' असे ठेवले आहे. विनोद जैन हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यम अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. खरं तर काँग्रेस नाव ठेवण्यामागचे कारण म्हणजे विनोद जैन आणि त्यांचे कुटुंबीय अनेक काळापासून काँग्रेसचे समर्थकच आहेत. याचाच प्रभाव असेल असंही बोललं जात आहे. त्याचबरोबर विनोद जैन यांच्या मुलाचा जन्माचा दाखलाही मिळाला. यात दाखल्यावर मुलाचे नाव काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे. साहजिकच या नावामुळे त्यांच्या घरचे नाराज होते मात्र ते आपल्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवण्यावर ठाम होते. मुलगा झाल्यास त्याचे नाव काँग्रेस ठेवणार हे अगोदरच विनोद जैन यांनी जाहीर केले होते.