स्त्रियांचे अपमान करणारे संभाजी भिडेंची ही पहिली वेळ आहे का?
X
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असं खालच्या पातळीचं वक्तव्य भिडेंनी केलं.भिडे यांच्या वक्तव्यानंतर महिला वर्ग, समाज आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही भिडे यांच्या विधानावर प्रचंड टीका होत आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा बोखडे यांनी “संभाजी भिडे स्ञीत्व, अस्तित्व, मातृत्व हि शब्द तुमच्यासाठी फार अनाकलनीय आहेत, पेलणार नाही तुम्हाला, उच्चारू नका आणि नादी ही लागू नका, जड जाईल,” अशी टीका ट्विटवरुन शिल्पा बोखडे यांनी केली आहे. “आज तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला धक्का लावला आहे. तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत, हे दुर्दैव आहे,” असंही बोखडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
https://twitter.com/BodkheShilpa/status/1209516899354083329
याआधीही देखील संभाजी भिडेंची स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी “माझ्या शेतातला आंबा खाणाऱ्या जोडप्याला आपत्यप्राप्ती होते. १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून त्यापैकी दीडशे जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाली आहे,” असा दवा त्यांनी केला होता. त्याचबरोबर चांद्रयान २ मोहिमेला अपयश आले तेव्हा अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.