महाराष्ट्र लॉक डाऊन! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
X
जगभरात थैमान घालणाऱ्या कोराना व्हायरस ला रोखण्यासाठी राज्य सरकार ने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात सध्या कोरोना व्हायरसचे 74 रुग्ण असून आत्तापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मध्यरात्री पासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या नागरी भागामध्ये 144 कलम लागू होईल. पाचपेक्षा अधिकजण एकत्र येऊ नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला यांच्यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यासाठी गर्दी करू नका. बँक तसंच शेअर बाजारही सुरू राहील. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 5 टक्के कर्मचारी असतील.असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरस गुणाकार पद्धतीने पसरतो आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
वाहतूक व्यवस्था बंद होणार!
राज्यातील सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्याचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधीत करताना केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व एसटी वाहतूक, खाजगी वाहतूक सेवा बंद करण्यात येणार आहेत. शहरातील वाहतूक यंत्रणा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रेल्वे प्रशासनानं 31 मार्चपर्यंत सर्व पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत.
विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल. असं म्हणत कोरोना संदर्भात राज्यसरकारने कठोर पावलं उचलली असल्याचं आज राज्य सरकार ने जाहीर केलं.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील. सहकार्य करा
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
काय सुरु राहील...?
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
शासकीय कार्यालयं सुरु राहतील. मात्र, शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.
काय बंद राहील...
आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील. मात्र, भाविकांसाठी दर्शन बंद राहील
https://youtu.be/BUju0CIXo-o