Home > रिपोर्ट > पाथरीचे नामांतर "साई धाम" करा आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी

पाथरीचे नामांतर "साई धाम" करा आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी

पाथरीचे नामांतर साई धाम करा आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी
X

अलीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर पाथरी वादाला तोंड फुटले. सर्वधर्माची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी कधी आपली जात धर्म उघड केला नसून साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. हा वाद शांत होत नसून आमदार मेघना बोर्डीकर यांनी साईबाबांच्या जन्मस्थानाचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. पाथरीचे "साई धाम" असं नामांतर करावे अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्या आपल्या या मागणीवर ठाम असल्याचे बोलले आहेत.

https://youtu.be/wtKrz52iBLw

Updated : 25 Jan 2020 12:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top