CBSEबोर्डात मुलींनी मारली बाजी
X
आज सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनींनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यांना प्रत्येकी ४९९ इतके गुण मिळाले आहेत.
यंदा १२ लाख ८७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यात ७,४८, ४९८ विद्यार्थ्यांचा तर ५, ३८, ८६१ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षी ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी इयत्ता १० वीचे निकाल २६ मे, तर १२ वीचे निकाल २९ मे या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळी मात्र निवडणुकीमुळे सीबीएसईच्या परीक्षा लवकर आटोपण्यात आल्या होत्या. पेपर तपासणीचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले होते.
सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनाcbseresults.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाचा यंदाचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे.