Home > रिपोर्ट > पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरीकत्व

पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरीकत्व

पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरीकत्व
X

नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. दरम्यान पाकिस्तानमधून आलेल्या हसीनाबेन अब्बासअली वरसारिया या मुस्लिम महिलेला कोणत्याही नियमांची विचारपूस न करता केवळ मेरीट आणि मानवता अधिकाराच्या आधारावर नागरिकत्व देण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) मध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र एका पाकिस्तानी महिलेला भारताने कसं काय नागरिकत्व दिलं यावर आता गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://twitter.com/COLLECTORDWK/status/1207517307552985088?s=20

हसीनाबेन अब्बासअली वरसारिया या मूळच्या भारतीय आहेत. १९९९ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या पाकिस्तान मध्ये गेल्या. मात्र पतीचे निधन झाल्यानंतर त्या पून्हा भारतात आल्या. त्यांनी आपले नागरिकत्व मिळवण्यासाठी याआधी गुजरातमधील द्वारका जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. यानंतर द्वारका जिल्हाअधिकारी नरेंद्र कुमार यांनी त्याना नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. नरेंद्र कुमार यांनी स्वतः याची ट्विट करून माहिती दिली आहे.

Updated : 19 Dec 2019 12:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top