बॉलिवुडच्या अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा जास्तच सरस
X
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र यामध्ये बॉलीवूड कलाकारांनी सक्रिय भाग घेतला आहे. या सर्व वादाकडे पाहता राजकारणासारखे बॉलीवूडमध्ये देखील दोन मतप्रवाहाचे गट पडलेले दिसून येतात. यामध्ये बॉलीवूडमधिल दिग्गज कलाकार शाहरुख खान,सलमान खान ,आमिर खान इ. अजूनही गप्प आहे मात्र या दबंग अभिनेत्री रस्त्यावर उतरल्या आहेत. देशातील अनेक मुद्द्यांवरती काही कलाकार व्यक्त होऊन आपली भूमिका स्पष्ट करतात. यामध्ये बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचं नाव आता चर्चेत आलं आहे. याआधी रेणुका शहाणे,उर्मिला मातोंडकर,कंगना रणौत, ट्विंकल खन्ना मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी यांनी आपली भूमिका माध्यमांद्वारे जाहीर केली. या आंदोलनाबाबत कुठलाही मोठा स्टार का बोलत नाहीये, असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. .यासर्वांचा घेतलेला हा आढावा
१) दीपिका पदुकोण :
विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसोबत दीपिका पदुकोण जेएनयूत गेली. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वांना एकजुटीने राहण्याचं आवाहनही केलं. यावेळी दीपिका जेएनयूत दहा मिनिटं होती. दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपने त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यावर ट्विटवर ट्रेण्ड देखील सुरु आहेत. #BoycottChhpaak,#DeepikaGoesToJNU, #bycottdeepika त्याचबरोबर तिच्या समर्थनार्थ #IStandwithDeepika #ISupportDeepika असे ट्रेन्डवॉर सुरु आहे.
२ रेणुका शहाणे :
रेणुका शहाणे हिने तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विट वर प्रतिक्रिया देत आपलं मत माडलं होतं. "सर, तुम्ही कृपया तुमच्या IT सेलचे ट्विटर हँडल चालवणाऱ्यांनाही त्यापासून दूर राहायला सांगा. ते सर्वाधिक अफवा आणि गैरसमज पसरवत असतात, जे बंधुभाव, शांतता आणि एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमचा IT सेल खरी 'तुकडे-तुकडे गँग' आहे. त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा." असं आशयाचे ट्विट तिने केलं होतं.
https://twitter.com/renukash/status/1206618988207173632?s=20
३) शायोनी गुप्ता :
अभिनेत्री शायोनी गुप्ता हिने ट्वीट करत "जामिया आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या वतीने मी विनंती करते, की तुमच्यापैकी किमान एकाने तरी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात, विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराविरोधात बोलायला हवं. बोलण्याची हीच वेळ आहे - हो? नाही? कदाचित?" असं ट्विट केलं होतं.
https://twitter.com/sayanigupta/status/1206302403839946753?s=20
४) स्वरा भास्कर :
दिल्लीतल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं तेव्हा स्वरानं म्हटलं होतं, "दिल्लीत जामियामध्ये अश्रूधुराचा वापर झाल्याची, हिंसाचाराची माहिती मिळतीये. हे धक्कादायक आहे. विद्यार्थ्यांना असं गुन्हेगारांसारखं का वागवलं जातंय? वसतीगृहांत अश्रूधुराचा वापर का होतो आहे? दिल्ली पोलीस, हे काय सुरू आहे? धक्कादायक आणि लज्जास्पद. " असं ट्विट केलं होतं.
https://twitter.com/ReallySwara/status/1206241093026635782?s=20
५ ) ट्विंकल खन्ना:
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने यावर एक ट्विट केलं असून तो वायरल झालं आहे. भारत हा असा देश आहे कि जिथे विद्यार्त्यांपेक्षा गाईला जास्त संरक्षण मिळतं मात्र आता हा देश झुकण्यासाठी तयार नाही . तुम्ही जनतेचा आवाज दाबू शकत नाही, लोकं रस्त्यावर येतील आणि आंदोलन करतील अशी भूमिका ट्विंकल खन्नाहिने ट्विटवर दिली.
https://twitter.com/mrsfunnybones/status/1214035399376543744?s=20
६ )सोनाली कुलकर्णी :
मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी हिने ट्विटरच्या माध्यमातून ‘आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि यांना दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचे आहे’, असं ट्विट सोनालीने केलं आहे.
https://twitter.com/meSonalee/status/1214591933697282050?s=20
दरम्यान, बॉलिवुडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी मात्र याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसंच मराठीतले कलाकार गप्प का अशीही चर्चा सुरु आहे.