Home > News > ‘उध्दव ठाकरे पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले’: कंगना

‘उध्दव ठाकरे पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले’: कंगना

‘उध्दव ठाकरे पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले’: कंगना
X

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगनाने शिवसेनावर टीका करताना भविष्यातील मुंबईविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच कंगनाने ट्विटरच्या माध्यातातून टीका करताना माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलं आहे. तर यावेळी तिने दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.

नेमकं काय म्हणाली कंगना?...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिका यांनी बेकायदेशीररित्या जेव्हा माझ्या घराचं तोडकाम करत होते, त्यावेळी त्यांनी या इमारतीवर लक्ष दिले असते तर आज जवळपास 50 लोक जिवंत असते. इतके सैनिक पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले. मुंबईचं काय होणार हे देवाला माहिती…”असे ट्विट कंगना रनौतने केले आहे.

दरम्यान, भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ वर पोहचली असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated : 24 Sept 2020 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top