उद्धव ठाकरे केवळ आश्वासनं देतात, कार्यवाही कधी?- चित्रा वाघ
X
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जनावरांना घेऊन चराईसाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार करुन तीची निघृण हत्या करण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेसंबंधित शासकीय यंत्रणेची उदासीनता यातुन दिसुन येते आहे. या संबंधित भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘मुख्यमंत्री केवळ आश्वासने देतात, मात्र कार्यवाही कधी?’ असा सवाल उपस्थित करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा...
- आपल्यातील भांडणं विसरूया अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट
- महिलांवरील अत्याचारात पुरुषांप्रमाणे महिला ही तितक्याच जबाबदार- चित्रा वाघ
महिला दिनाच्या दिवशी अकोले तालुक्यातील खानापुर येथे तरुणीचा मृतदेह सापडला. पीडित मुलगी सकाळी शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती. ही तरुणी संध्याकाळी घरी परत न आल्याने तिचा शोध घेतल्यानंतर रात्री तीचा मृतदेह सापडला. तरुणीवर अत्याचार करुन तीची निघृण हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपीचा अजुनही थांगपत्ता लागलेला नसुन ४ दिवसांपासुन आरोपीचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुलीच्या घरी तिची आई एकटीच असते. मुलीला वडील नाहीत. तिची घरची परिस्थितीही हलाखीची असून मुलीवरच त्यांचं घर चालत असल्याची माहिती मिळाली.
घडलेली घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे. पीडित मुलगी शेळ्या चारायला गेली असता, तिच्यावर निर्घृणपणे बलात्कार करून, तिला जीवे मारून टाकण्यात आले. या मुलीच्या घरी तिची आई एकटीच असते. मुलीला वडील नाहीत. तिची घरची परिस्थितीही हलाखीची आहे.(२/६) pic.twitter.com/7INb2dF2Kh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2020
या भेटीनंतर त्यांनी ‘महिलासंबंधित मुद्दे येतात, तेव्हा मुख्यमंत्री केवळ आश्वासने देतात.’ अशी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.