कष्टाच्या कामावर श्रद्धा ठेवत, श्रद्धा बनली यशस्वी उद्योजिका: स्वावलंबी बनण्याचा महिलांना दिला संदेश
X
आपल्या अवती भवती अनेक कौशल्य संपन्न महिला घरातील चूल आणि मूल या चाकोरीबद्ध जीवनात अडकलेल्या असतात. मात्र याच चाकोरीच्या बाहेर पडून अनेक महिला या स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत आहेत. कोणत्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करून स्वतःसा सक्षम व स्वावलंबी बवत आहेत. त्यातल्याच एक म्हणजे रोह्यातील श्रद्धा कन्हैया पडवल.
मोटार सर्व्हिस सेंटर चालविणाऱ्या श्रद्धा कनैया पडवल या रोहयातील दमखाडी येथे राहातात. या घरालगत रस्त्यावर त्यांचे मोटार सर्व्हिस सेंटर आहे. पूर्वी हा व्यवसाय त्यांच्या सासू चालवत होत्या, मात्र वाढते वय व आजारपण यामुळे सर्व्हिस सेंटर बंद करण्याची वेळ आली होती. यावेळी आपल्या सासुकडून प्रेरणा घेऊन कोणतेही काम लहान नसते, काम करून घाम गाळून दाम मिळवण्यात वेगळेच समाधान मिळते, हे श्रद्धा ने जाणले आणि सर्व्हिस सेंटरच्या मोटारीला त्यानी गती दिली.
स्वतःच्या हिमतीवर मुलं, सासू-सासरे यांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत श्रद्धा हे मोटार सर्व्हिस सेंटर चालवत आहेत. त्याच बरोबर त्या यशस्वी उद्योजिका म्हणून उभारी देखील घेत आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहून आत्मनिर्भर बनावं, त्याचबरोबर कोणत्याही कामाची लाज बाळगू नये, कष्टाला महत्व द्यावे, आणि स्वतःला सिद्ध करावे, असा संदेश श्रद्धाने सर्व महिलांना दिलाय.
- धम्मशील सावंत