Lockdown effect : ‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकावर भाजीपाला विकण्याची वेळ
X
लॉकडाउमुळे कंपन्या बंद पडल्याने अनेकांचा रोजगार गेला. याचाच फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने ‘बालिका वधू’ सारख्या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या रामवृक्ष गौड यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे.
रामवृक्ष हे सध्या उत्तर प्रदेशातील आजमगढ जिह्यातील आपल्या मूळ गावी भाजी विकण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर ते मुंबईवरून आपल्या मूळ गावी परतले होते. मात्र कामकाज नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. रामवृक्ष हे 2002 पासून छोटय़ा पडद्यावर काम करीत आहेत. भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर नव्याने टीव्ही उद्योगात नशीब आजमावण्याची इच्छा रामवृक्ष गौड यांची आहे.
रामवृक्ष यांनी आता पर्यंत ‘बालिका वधू’ ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘ज्योनति’ और ‘सुजाता’ सारख्या 25 पेक्ष अधिक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.