Home > रिपोर्ट > महाराष्ट्रतल्या पहिल्या महिला RTO अधिकारी अस्मिता दिघावकर यांचं निधन

महाराष्ट्रतल्या पहिल्या महिला RTO अधिकारी अस्मिता दिघावकर यांचं निधन

महाराष्ट्रतल्या पहिल्या महिला RTO अधिकारी अस्मिता दिघावकर यांचं निधन
X

अंधेरी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या अस्मिता दिघावकर यांचे आकस्मित निधन झाले आहे. अस्मिता दिघावकर या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पत्नी होत्या. मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान त्‍यांच्‍या राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.

घराच्या बाथरूममधून बऱ्याच वेळ त्या बाहेर न आल्याने जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा त्या बाथरूममध्ये पडलेल्या होत्या. त्यांना त्वरित कासारवडवली येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मात्र त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. दिघावकर हे ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Updated : 5 Jun 2019 11:30 AM IST
Next Story
Share it
Top