Home > रिपोर्ट > कोरोनाच्या पार्शवभूमीवर पाथर्डी येथील आशा सेविका देत आहेत अविरत सेवा

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पाथर्डी येथील आशा सेविका देत आहेत अविरत सेवा

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पाथर्डी येथील आशा सेविका देत आहेत अविरत सेवा
X

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचे सर्वाधिक प्रमाण शहरी भागात दिसून येत आहे. शहराकडे नोकरी आणि शिक्षणासाठी गेलेल्यांचा खेड्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झालीय. अशा परिस्थितीत स्थलांतरीतांनी गावची वाट घरली आहे.

शहराकडून गावाकडे येणाऱ्या या नागरिकांमुळे गावातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची जबाबदारी वाढली आहे. स्थवांतरीतांमुळे गावात कोरोनाचा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आशा सेविका घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाची नोंदणी ठेवली जात आहे.

पाथर्डी येथील आशा सेविकाही घरोघरी जाऊन गावातील लोकांची तपासणी करत आहेत. कोरोनामुळे गावातील लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्णाण झालं आहे. अशा परिस्थितीत आशा सेविकांनी आपल्या सेवेचं व्रत कायम ठेवलं आहे.

गावातील एकाही माणसाचा जीव जाणार नाही अशी खात्री आशा सेविकांनी दिली आहे. रणरणत्या उन्हात आम्ही फिरतो आहोत. जीवाचा विचार न करता, कुटुंबाचा विचार न करता आम्ही आशा सेविका गावाची सेवा करु असा विश्वास व्यक्त करत आहेत.

Updated : 11 Jun 2020 4:58 PM IST
Next Story
Share it
Top