कंगना राणावत ला अटक करा ट्वीटर वर ट्रेंड
X
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर नरेंद्र मोदी यांच्या ट्वीट ला उत्तर देताना कंगना राणावत ने 'ये वहीं आतंकी है' असं म्हटलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना आतंकी म्हणजेच अतिरेकी म्हणणाऱ्या कंगनावर अनेक लोकं तुटून पडले. आपण शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलेलं नाही, तसं सिद्ध झालं तर मी ट्वीटर सोडून देईन असं ट्वीट कंगना राणावत ने केलंय. मात्र खुलाश्याचं ट्वीट करत असतानाही कंगना राणावत ने श्रीकृष्णाच्या नारायणी सेनेचा उल्लेख ही नेटकऱ्यांना आवडलेला नाही.
'जशी श्रीकृ्णाची नारायणी सेना होती तशी पप्पूची ही आपली एक चंपू सेना आहे, जी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते. ' असं कंगनाने म्हटलं आहे. मात्र या खुलाश्यामुळे ती जास्तच ट्रोल झालीय. Arrest_Casteist_Kangna असा ट्वीटर ट्रेंड सध्या ट्वीटर वर नंबर एक वर सुरू आहे. इतर कोणी असं म्हटलं असतं तर सोडलं असतं का, शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणाऱ्या कंगनाला अटक का नाही असा सवाल नेटकरी विचारत आहेत.