Home > रिपोर्ट > शेतकऱ्याची मुलगी कायद्यात नंबर वन

शेतकऱ्याची मुलगी कायद्यात नंबर वन

शेतकऱ्याची  मुलगी कायद्यात नंबर वन
X

माढा तालुक्यातील उपळाई(खुर्द) ची कन्या अनिता दादा हवालदार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनिता हवालदार राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. लोकसेवा आयोगामार्फत सप्टेंबर 2019 मध्ये न्यायाधिश पदाकरिता मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाने शनिवारी रात्री सायंकाळी सहा वाजता जाहिर केला. यात राज्यातील 190 विद्यार्थी पदासाठी पात्र ठरले. तसेच, परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने प्रवीण भिर्डे; तर तृतीय क्रमांकाने वैशाली निरगुडे उत्तीर्ण झाल्या आहेत. सोलापूरच्या दयानंद विधी महाविद्यालयाची विद्यार्थी अनिताने दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केलंय. अनिताचं प्राथमिक शिक्षण चिकलठाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर तर अकरावी-बारावी ही पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालंय. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी अनिताने हे यश मिळवून अनेकांनासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

https://youtu.be/ZFSbCXvurCM

Updated : 23 Dec 2019 12:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top