अलिगढमध्ये चिमुरडीची हत्या... तिच्या समर्थनात एकवटलं बॉलिवूड
X
सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधील 2 वर्ष सहा महिन्याच्या ट्विंकल शर्मा नावाच्या मुलीच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जात आहे. #JusticeForTwinkleSharma या हॅशटॅग खाली लोक व्यक्त होत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांसह नेटिझ्नसचा देखील समावेश आहे. काही लोकांचा यावर देखील राग आहे की, इतर प्रकरणावर व्यक्त होणारे लोक सोशल मीडियावर व्यक्त होत नाही.
काय आहे प्रकरण?
2 वर्ष 6 महिन्याच्या ट्विंकल शर्मा नावाच्या मुलीचं 31 मे 2019 ला अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर तिचा मृतदेह 2 जूनला मिळाला. त्यानंतर सोशल मीडियावर या मुलीचा रेप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीवर अत्याचार झाला नसल्याचं म्हटलं आहे.
https://twitter.com/aligarhpolice/status/1136513645762863104
अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी या संदर्भात ट्विट केलं असून या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
https://twitter.com/anupampkher/status/1136691088981409792?s=12
अभिनता अनुपम खेर यांनी या लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याला भररस्त्यात फाशी द्या. याची दुसरी शिक्षा असू शकत नाही. असं म्हणत अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या सोशल मीडियावर या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अलीगढ पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून‘ट्विंकल वर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
https://twitter.com/i/status/1136277957628923906
पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाली असून पोलिसांनी या प्रकरणात जाहिद व असलम यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचं अलिगढ पोलिसांनी म्हटलं आहे.