प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरण: बॉलिवूडकरांनी व्यक्त केला निषेध
Max Woman | 30 Nov 2019 12:21 PM IST
X
X
हैदराबादमध्ये एका २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानं संपूर्ण देश हादरुन निघाला आहे. या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. सोशल मीडियावरती देखिल या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर बॉलिवूडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारनं याविषयी ट्वीट करताना लिहिलं, हैदराबाद बलात्कार प्रकरण असो तमिळनाडू असो किंवा मग रांचीतील कायदा शाखेच्या विद्यार्थीनीवर झालेला सामुहिक बलात्कार असो. आपण एक समाज म्हणून प्रत्येक दिवशी हारत आहोत. असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे. ज्यात फरहान अख्तर, शबाना आजमी, टीव्ही शो क्राइम पेट्रोलचा होस्ट अनुप सोनी, अभिनेत्री यामी गौतम यांचा समावेश आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/1200400674762059784?s=20
https://twitter.com/yamigautam/status/1200329970473586688?s=20
https://twitter.com/AzmiShabana/status/1200420735598153728?s=20
Updated : 30 Nov 2019 12:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire