अमिताभ गुप्तांना बनवलं बळीचा बकरा- रविना टंडन
X
राज्यभरात लॉकडाऊन असताना DHFL आणि YES BANK घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यास परवानगी दिल्याप्रकरणी आता पहिली कारवाई झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृह खात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
हे ही वाचा...
- पवार समर्थक तरुणीच्या पाठीशी उभ्या राहिल्या भाजप नेत्या चित्रा वाघ
- Covid19 Update : राज्यात एका दिवसात २२९ नवीन रुग्णांची भर
गृहखात्याकडून अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते. या प्रकरणी अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tandan) हिने नाराजी व्यक्त करताना अमिताभ गुप्ता यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं ट्वीट केलंय.
“मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर गृह विभागाचे विशेष सचिव अभिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी त्यांच्या विरोधात सुरू करण्यात आलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई कायम राहील”, असं ट्विट गृहमंत्र्यांनी केले आहे.
As per discussion with Hon. CM, Mr Amitabh Gupta, Principal Secretary (special), has been sent on compulsory leave with immediate effect, till the pending of enquiry, which will be initiated against him.#LawSameForEveryone
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
यावर रविना टंडन हिने “अमिताभ गुप्ता यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. त्यांना असे आदेश देण्यासाठी नक्कीच दबाव टाकण्यात आला असावा. नेहमीच यांच्यासारखे पोलिसचं यात फसतात. त्यांचा भुतकाळ पाहा आणि मगच न्याय करा. वरती असणारा राजा प्याद्यांच्याच जीवाचं बलीदान देतो.” असं मत व्यक्त केलं आहे.
Amitabh Gupta is being made the scapegoat.mustve been pressured to give this https://t.co/XQOqOW9hzf’s always these poor cops who are the fall guys.See his past record and judge.The kings at the top have sacrificed pawns for biggies. https://t.co/L85ACsCiha
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 10, 2020