गुंड्यांच्या हल्ल्यातून अभिनेत्री माही गिल थोडक्यात बचावली
Max Woman | 20 Jun 2019 12:12 PM IST
X
X
ठाण्यातील घोडबंदर परिसरातील एक शिपयार्डमध्ये ‘फिक्सर’ वेबसिरीजच्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरु असताना चार गुंडांनी सेटवर हैदोस घातला आणि सेटवरील लोकांना लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्री माही गिलसह चित्रपटाच्या टीमने केला आहे. मात्र ही गुंडगिरी सुरु असताना या ठिकाणी पोलीस देखील उपस्थितीत होते. सेटवरील लोकांनी पोलिसांना या बाबत सांगूनही पोलीसांनी कोणतीही कारवाई न करताना आणखी मारहाण करा असंं गुंडांना सांगितल्याचं माही गिल आणि तिच्या टीमने या व्हिडीओत म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं सेटवर?
घोडबंदर रोडवरील मीरारोड येथे चित्रिकरणाची परवानगी घेतली असूनही ही परवानगी नसल्याचं सांगत गुंडांनी सेटवर हल्ला केला. समोर येईल त्याला रॉड आणि दंडुक्यांनी मारहाण केल्याचा दावा सेटवरील कलाकरांनी केला आहे. सेटवरील कॅमेऱ्यांसह महागड्या सामानाची तोडफोड केली आहे.
अटल बालाजीची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा काल चित्रपटाचे दिग्दर्शक सोहम शाह यांच्या वर आहे. हल्ल्यात शाह यांच्यासह छायाचित्रकार संतोष थुडियाल जखमी झाले. संतोष यांच्या डोक्याला जखम झाल्यामुळे सहा टाके पडले आहेत. सेटवर गुंडांनी राडा घातला, त्यावेळी वेब सीरिजमध्ये भूमिका करणारे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया, अभिनेता शब्बीर अहलुवालियाही उपस्थित होते. काही गुंड माझ्या दिशेनेही मारहाण करण्यासाठी आले, मात्र महिलांना हात लावू नका… असं कोणीतरी म्हणाल्यामुळे ते मागे फिरले असं माहीने सांगितलं.
आम्ही पोलिसात न जाण्याचं कारण ?
सेटवरील हा राडा पोलिसांच्या उपस्थितीत झाल्यामुळे आम्ही पोलिसांकडे न जाता हा व्हिडीओ तयार करत आहोत. कारण पोलीसं स्वतः सांगत होते आणखी मारहाण,तोडफोड करा असं सेटवरील टीमने या व्हिडिओत म्हटलं आहे.
पाहा हा व्हिडिओ….
एकंदरित असे प्रकार या आधी नागपूरमध्ये देखील घडले होते. पोलिसांना कायद्याची भिती वाटत नाही ज्यांनी कायदा सांभाळयाचा आहे, कायदा सुव्यवस्था राखायची आहे ते पोलीसच गुंड असल्यासारखे वागतायेत आणि त्यांच्यावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक नाही असं वारंवार समोर होतंय.
Updated : 20 Jun 2019 12:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire