Home > रिपोर्ट > आरे LIVE : प्रियंका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात

आरे LIVE : प्रियंका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात

आरे LIVE : प्रियंका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात
X

आरे इथे मेट्रोकारशेड ची उभारणी करण्यासाठी रात्रीच्या सुमारास वृक्षतोड करण्यात आली. वृक्षतोडीची माहीती कळताच सर्व पर्यावरणप्रेमी या प्रकाराला विरोध करण्यासाठी आरे कॉलनी येथे पोहचले, शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतूर्वेदी देखील या प्रकाराला विरोध दर्शवण्यासाठी आरेत पोहचल्या, यादरम्यान पोलीसांसोबत झालेल्या वादामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

(aarey) आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उच्च न्यायलयाने फेटाळून लावले असुन न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल सर्वच स्तरातुन नाराजी व्यक्त केली जात आहे. काल रात्रीपासुन आरेत पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच होती.

या गर्दीच रुपांतर पुढे संतापजनक वातावरणात झाल्यामुळे आज सकाळपासून या भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Updated : 5 Oct 2019 8:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top