Home > Max Woman Blog > आपल्या विद्यार्थीनीसाठी ती बनली हिरकणी

आपल्या विद्यार्थीनीसाठी ती बनली हिरकणी

आपल्या विद्यार्थीनीसाठी ती बनली हिरकणी
X

लग्नानंतर शिक्षण घेणा-या अनेक मुली आपल्याला आजही बघायला मिळतात मात्र लहान मुलं साभांळण्यासाठी त्या घरातल्यांवर अवलंबुन असतात. घरात सपोर्टींगला जर कोणी नसेल तर त्या मुलींच्या शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आपण बघतो किंवा त्या शिक्षणा बाहेर फेकल्या जातात.

अटलांटा येथील जोर्जीया जुनीट काॅलेज Georgia Gwinnett college ) येथील रमाटा सिसेस ( Ramata cisse ) या बायोलाॅजी शिकवणा-या प्राध्यापीकेला तीच्याच एका विद्यार्थीनीचा फोन आला व त्यात तीने सांगितले की मुलाचा सांभाळकरणारी मदतनीस येणार नाही त्यामुळे तीच्या सात महिन्याच्या बाळाला तीला वर्गात घेवुन यावे लागेल, क्षणाचाही विलंब न लावता तीने त्यासाठी होकार दिला.

दुस-या दिवशी तासाला हे मुल आई सोबत आले खरे मात्र ती काही शांत बसेना सतत चुळबुळ करु लागले.

त्यामुळे विद्यार्थीनीला लिहीता येईना. हे सर्व या प्राध्यापिका बघत होत्या त्यांनी स्वतः या मुलाला आपल्या जवळ घेतले व आपल्या जवळील कोट खांद्याला बांधून त्यांनी दोन तास आपले काम केले. उबदार कुस मिळताच ते मुलं शांत झोपी गेले. वरवर पहाता गोष्टी सारख्या वाटणा-या घटनेत अनेक मुद्दे आपल्याला लक्षात येतात. हे सगळं मुलीनी शिक्षण व लहान मुलांच्या पोषणाशी अतीशय जवळचे मुद्दे आहेत. अनेकदा कुटुंबाकडुन समाजातकडुन योग्य ते सहकार्य न मिळाल्याने महिला या शिक्षण तसेच नोकरीतुन बाहेर पडतांना दिसतात. मुलांच्या सांभाळाची जबाबदारी आईवर टाकुन सर्व रिकामे होतात मात्र त्या मातेला मुलाच्या सांभाळा बरोबरच त्याचे संगोपन करण्यासाठी तसेच पोषण करण्यासाठी योग्य ते वातावरण क्वचितच देतात. किती शिक्षण घेणा-या मुली आपल्या मुलांना स्तनपान करु शकतात? किती संस्था त्यासाठी लवचीक धोरण आखतात? बेटी पढाव म्हणत असतांना लग्न मुल किंवा करियर असेच पर्याय मुलीं समोर ठेवले जातात. मुलं शिक्षण व करियर सहज हातातहात घालुन का जावु शकत नाहीत? यावर अआपण खरंच विचार करतो का?

या सर्वानवर प्रोफेसर यांच उत्तर मार्मिक ठरते. आपण ईतके लवचीक धोरण का स्वीकारल्या यावर त्या सांगतात , “मुलांचे योग्य पालन व पोषण व्हावे असे वाटत असेल तर आईलाही पोषक वातारण मिळायला हवे.” “मी तुझ्यासाठी आहे” या शब्दाचा आधार हा केवळ आईलाच नसतो तर मुलांच्या योग्य वाढीलाही तो पोषक असतो.

-प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 13 Dec 2019 5:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top