Home > रिपोर्ट > या आहेत सैन्यदलातील शक्तिशाली सैनीक माता

या आहेत सैन्यदलातील शक्तिशाली सैनीक माता

या आहेत सैन्यदलातील शक्तिशाली सैनीक माता
X

काम करणाऱ्या अनेक महिलांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा व लाभ यांचा आढावा घेतल्यास लक्षात येते, की असंघटीत महिलांना अजूनही मातृत्व रजा, पाळणाघर, स्तनपान सुविधा, रात्रपाळीवेळी ने-आण करणारी सुविधा, स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. मध्यंतरी ऑस्ट्रेलियातील राजकारणी आणि संसदेच्या सभासद लॅरिसा जॉय वॉटर यांचा व्हिडिओ वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या आपली मुलगी आलिया हीला स्तनपान करतानाचा फोटो आणि व्हिडिओ वायरल झाला.

यावर त्यांनी केलेलं हे ट्विट

https://twitter.com/larissawaters/status/861830244906315776?s=20

Image result for Breastfeeding political leader

"नॉर्मलाइझ ब्रेस्टफीडिंग" या प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रसिद्ध छायाचित्रकार व्हेनेसा सिमन्स यांनी जगभरातील स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या असंख्य प्रतिमा संग्रहित केले. जगभरातील आपल्या मुलांची देखभाल करणार्‍या मातांच्या असंख्य प्रतिमा टिपल्या आणि शेयर केल्या. त्यांना यातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्यांची आताची सर्वात प्रसिद्ध सिरीज म्हणून सैन्यदलातील या स्त्रियांचे फोटो.

courtesy of huffpost

 courtesy of huffpost

ही सिरीज करत असताना त्यांनी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातील स्त्रियांचे फोटो काढत असताना सिमन्स यांनी सैन्य दलातील नेव्ही,आर्मी आणि हवाई दलाच्या गणवेशात स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचे फोटो संग्रहित केले.

 courtesy of huffpost

 courtesy of huffpost

 courtesy of huffpost

 courtesy of huffpost

हल्लीच्या काळात करीयरला प्राधान्य दिले जात असल्याने, एकाच अपत्यावर समाधान मानले जाते. पण, त्याचेही अनेकदा पालनपोषण योग्यप्रकारे केले जात नाही. स्तनपानाबाबत फक्त तरुण मातांमध्ये, त्यांच्या कुटुंबातच नाही तर, संपूर्ण समाजात सजगता निर्माण करण्याची गरज आहे. कारण नोकरदार महिलांना आपल्या बाळांना पाळणाघरात किंआवा नातेवाईकांकडे ठेवून कामावर रुजू होणे भाग असल्यामुळे त्यांना मध्येच आपल्या बाळांचे स्तनपान थांबवावे लागते. या गोष्टींचा विचार करुन त्यांनी ही कल्पना या छायाचित्राच्या माध्मातून व्यक्त केली.

-प्रियदर्शनी हिंगे

Updated : 5 Dec 2019 6:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top