१६ मुलांची आई, लंकाबाईचं कुटुंब पुन्हा उपाशी
X
२१ मुलांची आई म्हणून ऊसतोड कामगार लंकाबाई यांची कहाणी प्रत्येक मीडियाने काही महिन्यापूर्वी उचलून धरली होती. २१ व्यांदा गरदोर राहिलेल्या महिलेला सरकारी सुविधा न पोहचल्यामुळे त्यांच बाळ मृत्यू पावलं. अशा बातम्या अनेक चॅनल, वेबपोर्टल यावर पाहिल्या असतील. आज त्याच पालावर राहणाऱ्या लंकाबाई आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतेय.
करोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. अख्खा देश काही दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे गोर-गरिबांच्या हाती रोजगार नाही. आलेला दिवस कसा ढकलायचा, पैसा नसल्यामुळे घरची चूल कशी पेटवायची... अन्न धान्याचे रिकामे पडलेले डब्बे कसे भरायचे... आपण मोठ्यांचं चालून जाईल हो पण लेकरांच्या पोटाचं काय करायचं हा प्रश्न सतत पालावरील गोर-गरिबांना पडलेला असतो. त्यात सरकारी योजनेचा फायदा जरी असला तरी ते गोर-गरिबांपर्यंत लवकर पोहचत नाही. लॉकडाऊनच्या परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जरी अन्न धान्याचे ३ महिने मोफत राशन देणार असं जरी जाहीर केलं असलं तरी ते पालावर कधी पोहचेल याची शाश्वती नाही.
बीड जिल्ह्यात पालावरील लोकवस्तीतील कामगार हे सहा-सहा महिने ऊसतोडीला अनेक राज्यात, जिल्ह्यात जात असतात. नुकतेच लंकाबाई आणि काही आणखी बायका त्यांची पोरंबाळं घेऊन पालावर आले आहे. परंतु या महिला अंगणवाडीत आपल्या मुलांचे राशन घ्यायला गेले असता त्यांना आता नाही भेटणार असं सांगून परत पाठवलं गेलं.
दुसऱ्या दिवशी गेले असता सकाळी ८ ते दुपारी १२ च्या आत राशन आणयला यायचं असं सांगून राशन द्यायला टाळाटाळ करत असल्याचं लंकाबाई यांनी सांगितलं. नेहमीच आम्हाला असं करतात म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना अंगनवाडीत घेऊन गेले असताना अंगनवाडीसेविका सोडून तिचा नवराचं आमच्याशी उद्धटपणे बोलू लागला. आम्हाला राशन न देता आम्ही त्यांच ऐवढं बोलनं ऐकूण घेतलं नाही तिथून निघून आलो.
मग काही वेळानंतर आमच्यातल्या दोघींना पुन्हा बोलवून घेतलं आणि एका महिन्याचे राशन दिलं. पण आम्ही गरिबांनी असे कसे दिवस काढायचे. या परिस्थितीत अन्नासाठी वणवण करावी लागते असं लंकाबाईंनी सांगितलं. हे सर्व प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवलं. ही झाली पालावरील लोकांची वस्तूस्थिती.
सरकारी योजनांच्याअंतर्गत ६ महिने ते ३ वर्षाखालील लहान बाळांना पौष्टिक आहार दिला जातो. मात्र सरकारी यंत्रणेतील लोकं अशा पद्धतीने काम करत असतात की, सामान्य माणसांना सरकारला नावं ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही. आमच्या हक्काचं अन्न-धान्य देण्यासही सरकारी यंत्रणेतील कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचे तेथील स्थानिक महिलांनी सांगितलं. करोना विषाणूमुळे देश उपासमारीच्या उंबरठ्यावरही बसलेला करोनाच्याआधीचं ही बेरोजगारी आणि उपासमारी आम्हाला मारून टाकेल अशी भिती प्रत्येक गोर-गरिबांच्या मनात आहे.
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळ्या अंगनवाड्या बंद आहेत. त्यामुळे मुलांना दररोजचा आहार (खिचडी)मिळत नाही. म्हणून सरकारने या लॉकडाऊनच्या काळात मुलांना कच्चा आहार तरी वेळेत द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं पालावरील महिलांसोबत जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/665532870657526/