20 हजार महिलांमुळे मिळाले नदीला जीवदान...
X
देशात दुष्काळाचे सावट असताना संपूर्ण देशात जलसंधारणाच्या कामांना वेग आला. या भीषण दुष्काळाला तोंड देण्यासाठी तामिळनाडूमधील वेल्लोर शहराजावळील एका गावात महिला पुढे सरसावल्या...आणि मृत नदीला जीवदान मिळवून दिले.
तामिळनाडूत 24 गावे दुष्काळाच्या भोवऱ्यात सापडली.वेल्लोर शहराजवळून वाहणारी नागनदी मागील 15 वर्षांपासून कोरडी पडली होती.ह्या नदीमुळे शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणी मिळत होते. परंतु नदी कोरडी झाल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु होती. परिणामी पाण्याच्या शोधात तेथील स्थानिकांना स्थलांतर करावे लागले.
असं मिळालं नदीला जीवदान...
आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत नागनदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प सुरु झाला. या कामासाठी इतर नागरिक देखील जागृत झाले. आणि 20 हजार महिलांच्या सहभागातून 3,500 विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी बांध बांधण्यात आले.आणि चार वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रयत्नांना 2018 च्या मान्सून मुळे यश आले.आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते चंद्रशेखर कुप्पण म्हणतात कि “जेव्हा भूजलाची पातळी पुरेसी असते तेव्हा नदी खळखळून वाहते आणि म्हणूनच पाणीमातीत जिरेल कसं याकडे लक्ष देणे गरजेचे असते या वर्षी पाऊस सुरु झाला कि नदी पूर्वीसारखीच पुन्हा वाहू लागेल”....