कोरोनामुक्त मुंबईसाठी युद्धपातळीवर काम सुरु
X
मुंबईतील कारोना बाधितांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. बी.के.सी. मध्ये १,००८ रूग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत आणि अधिकाधिक बाधित लोक कोरोनामुक्त व्हावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
हे ही वाचा...
- चिंताजनक: देशात एका दिवसात ५३४२ कोरोनाबाधितांची नोंद, एकुण रुग्ण १ लाखाच्या उंबरठ्यावर
- Lockdown4: भुमीपुत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा
- राहूल गांधींवर टीकेप्रकरणी सीतारमण यांना ‘या’ बॉलिबुड अभिनेत्रीचं उत्तर
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या आपतकालीन व्यवस्था केंद्राला भेट दिली. सातत्याने त्या विविध केंद्रांवर भेट देऊन परिस्थिचा आढावा घेत आहेत.
मुंबईतील कारोनो बाधितांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. बी.के.सी. मध्ये १,००८ रूग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत व जास्तितजास्त बाधित लोक कोरोनामुक्त व्हावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.@INCIndia pic.twitter.com/RsDI6dBJsW
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 18, 2020
एकट्या मुंबईत सोमवारी १ हजार १८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील एकूण रुग्ण २१ हजार १५२ वर पोहोचले आहेत. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ चिंतेचा विषय ठरली आहे. सोमवारी मुंबईत ५०४ जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ५१६ झाली आहे दिवसभरात २३ रुग्णांचा बळी गेल्यामुळे बळींची संख्या आतापर्यंत ७५७ झाली आहे.