भीमा कोरेगावप्रकरणी अटक झालेल्या निर्दोष कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आज हॅशटॅग मोहीम
X
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांच्या कारवाईत अनेकांना अटक करण्यात आलीय. यांपैकी अनेकजण निर्दोष असून त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप होत आलाय. या निष्पाप लोकांसाठी आता नेटीझन्स सरसावले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर हॅशटॅग मोहीम राबवली जाणार आहे. आज (दि. ६) रोजी संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत 1YearBhimaKoregaonArrest हा हॅशटॅग फेसबुक आणि ट्विटरवर ट्रेंड केला जाणार आहे.
कोरेगाव भीमाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक आणि मानवीहक्क कार्यकर्ते आणि वकिलांची सुटका केली जावी ही प्रमुख मागणी या सोशल मीडिया आंदोलनाची आहे. लोकशाही वाचवण्यासाठी या ट्रेंडमध्ये अधिकाधिक नेटीझन्सनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. ट्रेंडमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (@dev_Fadnavis), मुख्यमंत्री कार्यालय (@CMOMaharashtra) आणि पुणे पोलीस (@PuneCityPolice) यांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करून पोस्ट कराव्यात.