Home > रिपोर्ट > प्रज्ञासिंहच्या विरोधात भुजबळांचा भोपाळमध्ये प्रचार

प्रज्ञासिंहच्या विरोधात भुजबळांचा भोपाळमध्ये प्रचार

प्रज्ञासिंहच्या विरोधात भुजबळांचा भोपाळमध्ये प्रचार
X

भाजपच्या भोपाळ इथल्या वादग्रस्त उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उद्यापासून (८ मे) दोन दिवस भोपाळमध्ये प्रचार करणार आहेत. काँग्रेसकडून दिग्विजय सिंह भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह हिने तत्कालीन एटीसए प्रमुख शहीद हेमंत करकरे आणि राज्य पोलिसांच्या विरोधात नुकतचं बेताल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्रज्ञासिंहवर सर्वस्तरातून टीका सुरू झाली. त्यामुळे प्रज्ञासिंहवर वक्तव्यं मागे घेण्याची नामुष्की ओढवली गेली. या पार्श्वभूमीवर भुजबळ भोपाळमध्ये प्रज्ञासिंहविरोधात प्रचार करणार आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटमधील आरोपी प्रज्ञासिंह यांच्याबाबतची वस्तुस्थिती भोपाळच्या नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्याकरिता भुजबळ हे भोपाळमध्ये प्रज्ञासिंहच्या विरोधात प्रचार करणार आहेत, असे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे.

Updated : 7 May 2019 12:13 PM IST
Next Story
Share it
Top