"जुन्या रूढीपरंपराना तडा देत ,केले मकरसंक्रांतीचे हळदी कुंकू"
X
राष्ट्रीय महिला अध्यक्ष किरण समाधान गि-हे यांचा स्तुत्य उपक्रम मकरसंक्रांतीचा महिना हा महिलां साठी आनंदाची पर्वणीच असते सर्वत्र सवाष्ण महिला सुंदर कपडे दागदागिने घालुन हळदी कुंकू साठी एकत्र येतांना दिसतात .एकंदरीत सर्वत्र आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण असते.पण समाजातला एक महिला वर्ग असा आहे ज्यांना काही कारणास्तव वैधव्य आले आहे .पतीचे छत्र हरवलेल्या ह्या महिला या सगळ्या आनंदी वातावरणा पासुन दुर असतात .अनेक धार्मिक आणि रूढीबद्ध कार्यक्रमात त्यांना स्थान नसते .पण अखिल भारतीय माळी महासंघ च्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण समाधान गिर्हे यांनी ह्या परंपरेला मुठमाती दिली .त्यांनी आपल्या निवासस्थानी 40 विधवा व परितक्ता महिलांना आमंत्रित करून संक्रांती निमित्त त्यांना भेटवस्तू देऊन तिळगुळ देऊन त्यांचा यथोचीत संम्मान केला .जिजाऊ ,सावित्री रमाई ,अहिल्याबाई च्या त्यागाची उदाहरणे देऊन त्यांचीे वैचारिक क्षमता मजबुत केली .यात रंजना पांडे ,रुख्मीना पोधाडे, पार्वती उम्बरकर,ताराबाई उम्बर कर, ज्योती कांबळे, करुणा बंडेवार ,शारदा कोष्टी,अल्का धामनकर,सुरेखा गायकवाड, गीता गीरी, कार्यक्रमाच्या यशा साठी अ.भा.माळी महासंघ च्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा राऊत ,शह राध्यक्ष .छाया मडके , ,मिना बगाडे,अनिता इंगोले,नंदा इंगोले, आरती इंगले,लक्ष्मी काळे सोनाली खोटेआदीनी परिश्रम घेतले.सोबतच इतर असंख्य महिला उपस्थित होत्या
https://youtu.be/yaWUiwCzcDU