जगावेगळ्या बायका म्हणजे काय ?
Max Woman | 22 Dec 2019 3:30 PM IST
X
X
अझीवा, एक तरुण मुलगी. दिससायला साधीशी, वयाने लहान अगदी व्होत्या छोट्या कारणांनी आई वडिलांना हाक मारेल अशी. परंतु असे सामान्य आयुष्य सर्वाना मिळतेच असे नाही. तुम्ही एखाद्या इराक सारख्या इस्लामिक देशात मायनोरिटी म्हणून राहात असाल तर कधीच नाही.
अझीवा याझडी कम्युनिटी मधली मुलगी. याझडी म्हणजे मध्य आशिया मधील एक स्थानिक जमात आहे ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. सर्व ठीक ठाक सुरू होते जोवर ISIS नावाच्या राक्षसाने मध्य आशिया ला ग्रासले. इस्लामच्या नावाने फक्त दहशतवाद फैलावणारी ही संघटना.
एखाद्या धर्माचे पालन न करणे किंवा स्वतःच्या धर्माप्रमाणे वागणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा ठरवायचा अधिकार कोणाचा? परंतु काही धर्मानंध अतिरेकी हा त्यांचा अधिकार समजतात. अझीवा इराक मधील सिंजल या ठिकाणी राहात होती. इसिस येणार येणार अशा अनेक धमक्या अनेक दिवस रे ऐकून होते. एक दिवस खरेक्सह वडिलांनी तिला इसिस साठी खंडणी गोळा करत असल्याची बातमी दिली. कसेही करून वडिलांना इतर कुटुंबीयांना घेऊन पळून जाण्यास तिने भरीस घातले. काही दिवसातच तिच्या गावावर हल्ला झाला आणि उर्वरित कुटुंबीय मारले गेले. जुलमी लोकांच्या नियमन प्रमाणे बायकांना आणि मुलींना ते ठेऊन घेत गुलाम म्हणून.
अझीवा कडे शिक्षण होते, स्वप्ने होती. साऱ्या जुलूमाना तोंड देऊन तिने तिथून पळ काढला. वेगवेगळे देश फिरत ती आज जीनिवा युनिव्हर्सिटी मध्ये पोचली आहे. राहिलेले शिक्षण पुरे करण्यासाठी.
आपल्या आप्तांना शोधून काढण्यासाठी. आणि हजारो लोकांच्या आयुष्याची वाताहत करण्याचा अधिकार कोणी दिला हा जाब विचारण्यासाठी.
तिचे वय आहे अवघे 24 वर्षे. एक रेफ्युजी चे आयुष्य ती जगत आहे. डोंगरा एव्हढा लढा एकटीने लढण्याचा वसा तिने घेतला आहे. पण तिच्यातील अवखळ लहान मुलगी मात्र अजून जिवंत आहे. UNIGE मध्ये student म्हणून रहाताना जेव्हा मदती चा पहिला हप्त आ मिळाला तेव्हा आता कॉलेज मध्ये जायचे म्हणून तिने बूट खरेदी केले. समाज म्हणून अझीवा आणि तिच्या सारख्या अनेक मुलींची स्वप्ने आपल्याला जपता येतील का?
-स्वाती बेडेकर
Updated : 22 Dec 2019 3:30 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire