Home > रिपोर्ट > …अन् मुख्यमंत्र्यांनी मुलींचे म्हणने मान्य केले....!

…अन् मुख्यमंत्र्यांनी मुलींचे म्हणने मान्य केले....!

…अन् मुख्यमंत्र्यांनी मुलींचे म्हणने मान्य केले....!
X

योग शिबिरातून प्रस्थान करताना माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी काही मुलां-मुलींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली. श्रेयस मार्तडे यांच्या स्मृती योगा ग्रुपच्या मुलां-मुलींचा हा संच होता. योगा प्रात्यक्षिकाची चांगली तयारी आणि त्याचा अनेक दिवसाचा सराव करुन या आम्ही योगाच्या प्रात्यक्षिकांची तयारी केली होती. आपण थांबा आणि आमचे सादरीकरण बघा असे समृद्धी कडगे, त्रिशा मारकोळे या मुलींनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जाण्याचे थोडावेळ थांबवून या मुलींचे म्हणणे मान्य केले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांना स्वत: स्टेजवर आणले. त्यांच्यासोबत फोटो काढले. तेव्हा कुठे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या मुलांनी अतिशय चापल्याने एकापेक्षा एक सरस योगा प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रामदेवबाबा यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे जाहीर कौतूक केले.

Updated : 22 Jun 2019 6:19 PM IST
Next Story
Share it
Top