अतिवृष्टी... कृष्णा - वारणा नद्यांना न भूतो न भविष्यती असा विशालकाय महापूर...
Max Woman | 9 Aug 2019 3:35 PM IST
X
X
जिकडे तिकडे पाणीच पाणी.. वाळवा तालुक्यातील असंख्य गावे पाण्याखाली गेली. हजारो कुटुंबे पुरात अडकली . त्यांना पुरातून बाहेर काढण्याचे आव्हान आणि नंतर त्यांची सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय हे एकीकडे घडत असतानाच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे हेही वाटते तेव्हडे सोपे काम नव्हते..!!
तालुक्याचे आमदार जयंत पाटील पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम अहोरात्र करत असतानाच त्यांच्या सौभाग्यवती शैलजा पाटील यांनी मातेच्या ममतेने पूरग्रस्तांना जेवु घालण्याचे पवित्र काम आपल्या शिरावर घेतले...
हजारो पूरग्रस्त,त्यांची भूक ओळखून शैलजा यांनी हे अवघड आव्हान स्वीकारून आपल्या निवासस्थानी स्वयंपाकगृहच उघडले आणि जेवणाची हजारो पाकिटे तयार करून ती पूरग्रस्तांना पोहोच केली....!!
गृहलक्ष्मी हि घर सांभाळणारी असावी असे म्हणतात. या लक्ष्मीने अख्खा तालुका सांभाळण्याचा विडा उचलला आणि गृहलक्ष्मी ही कठीण प्रसंगात न डगमगता धाडसाने खंबीरपणाने उभी राहून दानशूरपणाचा आदर्श घालून देत ही माऊली हजारो भुकेल्यांसाठी अहोरात्र राबली....!!
आमदार जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले तर वहीणींनी या लोकांना पोटभर जेऊ घालण्याचे पवित्र काम केले...!!
" प्रार्थना म्हणणाऱ्या ओठा पेक्षा मदत करणारे हात अधिक पवित्र असतात.." म्हणूनच हजारो भुकेलेल्यांना स्वयंपाक करून जेऊ घालणाऱ्या त्यांच्या पवित्र हातांना...सलाम...!!
केवळ पुरग्रस्तांनाच नव्हे तर पुणे - बंगळूर महामार्गावर दोन दिवस अडकून पडलेल्या वाहनधारकांना व प्रवाशांनाही वहिणींनी स्वतः कासेगावात जाऊन जेवण आणि पाणी दिले आणि प्रवाशांचीही आईच्या ममतेने काळजी घेतली....!!
भुकेलेल्याची भूक ओळखून मी कोण आहे हे विसरून ममत्वाला जागून शैलजा ताईंनी वेळेचे भान ठेवून केलेले काम हे अलौकीकच आहे...!!
त्यांचे त्रिवार अभिनंदनच....!!!
- सचिन बाळासाहेब कुंभार
Updated : 9 Aug 2019 3:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire