Home > Max Woman Blog > Yes, I missed my PERIODS !

Yes, I missed my PERIODS !

मासिक पाळीमध्ये असलेली ताकद तुम्ही कधी अनुभवली आहे का? गरोदरपणात पाळीला मिस करणाऱ्या शर्वरी सुरेखा अरुण यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. वाचा आणि आपलाही गरोदरपणातील अनुभव शेअर करा.

Yes, I missed my PERIODS !
X

मासिक पाळीच्या अवखळ चक्रामुळे मी आज हा नितांत सुंदर असा मातृत्वाचा प्रवास अनुभवू शकतेय. 'आपल्यासारखाच एक जीव निर्माण करण्याची तयारी आणि ताकद मासिक पाळी आहे' असं मी आणि सचिन कित्येकदा सत्रात म्हणाला असेल पण ही नवनिर्मिती स्वतः अनुभवणं फार सुखावणारी बाब आहे आणि म्हणून माझ्या पाळीविषयी मी फार कृतज्ञ आहे.

मला पाळीचे पहिले दोन दिवस फार दुखतं पण पाळीचा रक्तस्राव, स्त्रावाचा वास, रंग अगदी Normal आणि पाळीची तारीख कायम वेळेवरच राहिलीय. स्वतः Gymnastics Player आणि रोप मल्लखांब Coach असल्यामुळे आहार, व्यायाम आणि जीवनशैली आजतागायत काटेकोर आहे. Thanks to my mother जिच्यामुळे पाळीत पहिल्यापासूनच मी कापड वापरत आलेय आणि सचिन आयुष्यात आल्यापासून कापडी आशा पॅडचा वापर करतेय. तसेच पाळीत त्रास कमी करण्याच्या किंवा पाळी लांबवण्याच्या, गर्भनिरोधक अशी एकही गोळी आजतागायत खाल्ली नाहीये.

या सगळ्यामुळे आजपर्यंत पाळीत कसलाही जंतुसंसर्ग किंवा त्रास झाला नाहीच शिवाय गर्भ रहायला ही कुठली अडचण आली नाही. पाळीत कधीच, कुठेच, कसलीच अंधश्रद्धा मी पाळली नाही त्यामुळे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास वयानुसार वाढतच राहिला. पाळीच्या तारखांमध्ये मी आणि माझी मदत करायला सचिन दोघेही ठरवून Period Leave घ्यायचो पण तरीही काही वेळा Unavoidable कामांमुळे त्या दिवसातही प्रवास झाले; पण उलट त्याने माझी सहनशक्ती वाढली जी मला आता गर्भारपणात उपयोगी येतेय असं मी म्हणेन.

पहिली पाळी आल्यानंतर मी भांबावून गेले, पाळीच्या काळात मी शाळेत Matches खेळलीय, पाळीत कॉलेज- नोकरी केलीय, पाळीवर आजपर्यंत कित्तीतरी जणींसोबत- जणांसोबत बोलतेय, ऐकलंय, लिहिलंय अशी गेली पंधरा वर्षे मी पाळी सतत अनुभवतेय. या पाळीने माझं आजवरचं अर्ध आयुष्य व्यापलंय. आणि.. आणि ...आणि २६ जानेवारीला आलेली माझी शेवटची पाळी आता माझं पुढचं आख्खं आयुष्य व्यापणारे !!! एका पाळीने माझं आयुष्य आणखी समृद्ध होणारे म्हणूनच थोडी त्रासदायक असली तरी मी माझ्या मासिक पाळीबद्दल कृतज्ञ आहे !

माझी सखी- माझी पाळी या ९ महिन्यात आली नाही आणि पुढील काही महिने येणार ही नाही. त्यामुळे मी माझ्या पाळीला Miss करतेय. 'Missed' my Periods आणि 'Missing' my Periods या दोन्ही भावना मी सध्या एकत्र अनुभवतेय !

- शर्वरी सुरेखा अरुण

Updated : 18 Oct 2021 11:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top