#WorldBreastfeedingWeek : काय असतो बाळंतरोग?
X
साधारणपणे बाळंतरोग नावाचा आजार बाळंतिण बाईला बांळंतपणानंतर सव्वा महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत होत असतो. वली बाळंतिणीला म्हणूनच जपावं लागतं. घरी बाळंतिण होणाऱ्या बायकांना याचा जास्त धोका असतो.
दवाखान्यात बाळंतपण जर झाले तर डॉक्टर नर्स बाळंतपण करताना पोटातील घाण सगळी काढून टाकतात. म्हणजे योग्य उपचार करून पण घरी जर बाळंतपण केले गेले तर नऊ महिने पाळी चुकलेली असते. या नऊ महिन्यांचं रक्त साठलेलं असतं मग ते गाठीच्या स्वरूपात पोटात राहिलेलं असतं. यामुळे पोट दुखणं आणि त्यातून त्या गाठी निसटतात पण या रक्ताच्या गाठी आत तशाच राहिल्या तर गर्भाशयाच्या पिशवीला सुज येते. यामुळे बाईचे पोट दुखून सारखी हगवण लागते, तिचा बीपी लो होत जातो, खाल्लेलं पचत नाही यामुळे बाळंतिण बाई जायबंदी होते. एवढेच नाही तर गर्भपात होणाऱ्या महिलांना सुंद्धा बाळंतरोग होतो. अनैसर्गिक गर्भपात केला गेला म्हणजे चुकीच्या औषधी गोळ्या घरीच चारल्या गेल्या किंवा एखाद्या मांत्रिकाकडून किंवा उदा. मायअंगात (योनीमार्गे गर्भाशयात) छत्रीच्या काड्या घालून गर्भाशय जबरदस्ती उघडल्यास अर्धा गर्भ पडतो आणि आणि अर्धा पोटात तसाच रहातो (गर्भ जास्त महिन्याचा असल्यास) आणि मग तो गर्भ पोटात सडतो त्यांने मग अंगावरचं जास्त जातं. यामुळे सुद्धा महिला मरतात. साधारणतः.एकल विधवा कुमारीका या महिला गरोदर राहिल्यास पोट आलं म्हणून असे अघोरी उपाय करून बाळंतिण बाईच्या पोटाला डागून बाळंतरोगाच्या हवाली केले जाते. यामुळे होईल तेवढं माता मृत्यू टाळणं आणि बालमृत्यू कमी करणं जसं सरकारचं धोरण आहे तशी आपली ही सामाजिक जबाबदारी आहे.
- सत्यभामा सौंदरमल
निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
बीड