#MothersDay का करतात सेलिब्रेट?
X
प्यारी माँ... मेरी माँ... अशी काही आजच्या दिवसाची सुरुवात अनेक घरात झाली असावी. मे महिन्यातला दुसरा रविवार म्हणजे मदर्स डे... या मातृदिनाची सुरुवात कुणी केली? कधी केली...? का केली? याविषयीची माहिती तुम्हाला माहिती आहे का...? नाही ना चला तर मग जाणून घेऊयात...
मातृदिन म्हणजेच मदर्स डे... वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक मुलं आप-आपल्या आईला भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करत असतात. त्यांचा हा दिवस स्पेशल कसा केला जाईल याचा प्लानिंग या दिवशी केला जातो. आईच्या प्रति असलेली भावना, प्रेम या दिवशी व्यक्त केला जातो.
खरंतर आईला सन्मान देणाऱ्या या दिवसाची सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन एक्टिविस्ट एना जार्विस आपल्या आईशी खूप प्रेम करत होती. तिने लग्न न करता नेहमी आपल्या आईची साथ देत त्यांच्या सोबत राहिल्या. आईच्या मृत्यूनंतर तिने मदर्स डेची सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक देशात मदर्स डे साजरा होऊ लागला.
कधी साजरा होतो मदर्स डे?
9 मे 1914 साली अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता ज्यात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्सडे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिका, भारत आणि अन्य देशात साजरा होऊ लागला.