दुर्मिळ असणं म्हणजे काय?
X
माणसाचं मोठेपण त्याच्या मनात असणाऱ्या विशालतेने मोजले जावे. आपल्याकडे अनेक चुकीच्या संकल्पना रूढ झाल्या. त्यात या मोठेपणाच्या संकल्पनेबाबत मोठे गैरसमज आहेत. परवा अभिनेत्री रेखाची एक जुनी मुलाखत पाहत होतो. त्यात प्रश्न कर्त्याने विचारले, तुम्ही शांपू संपल्यानंतर त्यात पाणी घालून वापरता का? काटकसर म्हणून, रेखानी उत्तर दिलं ते खूप मार्मिक होतं...
मुळात रेखा एका अभिनेत्याच्या घरी जन्माला आलेली, भौतिक संसाधनात कोणतीही कमी नाही. अशा रेखाने उत्तर दिले, मुळात मी गरज आणि शौक यात अंतर ठेवते. गरज असेल तिथे काटकसर करते, शौक ही गोष्ट मनाशी निगडित आहे. ते दाखवायची गरज नाही. मी अभिनेत्री आहे. यापेक्षा एक माणूस आहे. हे मी कधीही विसरले नाही आणि विसरणार नाही. ही सगळी संस्काराची रियासत आहे.
मी मागे एका कार्यक्रमानिमित्त नसरुद्दीन शहा आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांना भेटलो होतो...
त्यावेळी मी जरा जास्तच भारावून गेलो होतो. आणि ते माझ्या देहबोलीतून दिसतं होतं. हे ओळखून नसरुद्दीन शहा म्हणाले होते. तुम्ही एका पात्राला (किरदार) भेटत आहात. हे विसरून नसरुद्दीन शहा नावाच्या माणसाला भेटत आहात हे फील ठेवा. आम्हीही अधिक मोकळेपणाने बोलू.
‘व्वा... मी एकदम नॉर्मल झालो मग...’ हे असे मनाची अंतर कमी करणारी लोकं. ही माणसं मनानी अथांग असतात हे अनेक प्रसंगातून लक्षात आले. आज नसरुद्दीन शहा यांचा वाढदिवस आहे म्हणून ही आठवण प्रकर्षाने इथे शेअर करतो आहे.... त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन.. !!
- युवराज पाटील