समाजसुधारक भगिनी निवेदिता
मार्गारेट नोबेल कशा झाल्या भगिनी निवेदिता ? जन्माने स्काॅटिश-आयरिश असूनही भारतीय तत्वज्ञानाकडे आकृष्ट होणाऱ्या समाजसुधारक महिलेची कहानी वाचा... भारतकुमार राऊत यांचा लेख
X
जन्माने स्काॅटिश-आयरिश असूनही भारतीय तत्वज्ञानाकडे आकृष्ट होऊन संन्यास घेणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा आज १०९ वा स्मृतिदिन. भगिनी निवेदिता तत्वज्ञ तर होत्याच शिवाय त्या उत्तम लेखिका व शिक्षक होत्या. त्यांचे मूळ नाव मार्गारेट नोबेल.
स्वामी विवेकानंद १८९३मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले, तेव्हा त्यांची प्रवचने ऐकून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. १८९५ मध्ये त्या भारतात आल्या. भारतात स्वामीजींनी त्यांना दीक्षा दिली व त्यांचे नाव भगिनी निवेदिता बनले.
भगिनी निवेदितांनी शैक्षणिक कार्य भारतात सुरू केले. त्यांनी कोलकात्यात गरजू व गरीब मुलींसाठी शाळा सुरू केली. नंतर त्यांनी रामकृष्ण मिशनचे काम सुरू केले पण त्याच काळात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने त्यांना मिशनचे काम सोडावे लागले.
पुढे भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्या भारतभर फिरल्या व त्यांनी विपुल लेखनही केले. स्वामीजींचे १९०२ मध्ये निधन झाले पण भगिनींनी पुढील दहा वर्षे कार्य चालूच ठेवले. डेहराडून येथे १९११ मध्ये आजच्या दिवशी त्या ईहलोकाचा निरोप घेऊन गेल्या.
- (भारतकुमार राऊत यांच्या फेसबुक भिंतीवरून)